
सोलापूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या शासन निर्णय, दिनांक 07 ऑक्टोबर 2015 तसेच शासन निर्णय व शासन परिपत्रक दिनांक 28 ऑक्टोबर 2025 अन्वये सन 2025-26 या वर्षासाठी धार्मिक अल्पसंख्यांक बहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शासन निर्णयातील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र संस्थांनी सन 2025-26 साठीचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय (नियोजन शाखा), सोलापूर यांचेकडे दिनांक 14 नोव्हेंबर 2025 पूर्वी सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी दिलीप पवार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड