
अकोला, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : राजंदा गावातील नागरिकांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे (MSRTC) गावात नियमित एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. या संदर्भातील निवेदन आज जिल्हा नियंत्रक आणि महाव्यवस्थापक (MSRTC), कार्यालय अकोला यांना सादर करण्यात आले.
मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे व शहर अध्यक्ष सौरभ भगत ह्यांच्या नेतृत्वाखाली गावातील नागरिक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या गावात कोणतीही सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे कर्मचारी, तसेच ज्येष्ठ नागरिकांना जवळच्या शहरात ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रुग्णांना वैद्यकीय सेवांसाठीही खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे आर्थिक बोजा वाढतो.ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, राजंदा गावातून दररोज सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ५.३० वाजता बससेवा सुरू करण्यात यावी, ज्यामुळे गावातील लोकांना सहज प्रवास करता येईल.या मागणीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांपर्यंत, तसेच नागरिकांना कामानिमित्त सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन बससेवा सुरू करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.निवेदन देतांना प्रशांत ठाकूर,तेजस चव्हाण,अनुराग सुरवशे,विठ्ठल महल्ले,शुभम धोत्रे,ओम खर,विशाल सुरोशे,मयूर काळे,सागर इंगळे,हर्षल सोळंके,हरीश केदार,शिवप्रताप मेघाडे,गुलाब अवचार,ओम अवचार,निलेश रखराव,सतीश ठाकरे,अजय नागरे,गणेश धोत्रे,राज नागे,अनिकेत झाकरडे,प्रतीक गायकवाड,प्रतीक पोधाडे,दीपक महल्ले,प्रणव आंधळे,सोहम बोंद्रे,शंभूराजे मित्र मंडळ व महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोला चे पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे