
नांदेड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। मुख्य कार्यकारी अधिकारी - जिल्हा परिषद, नांदेडयांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. राजेश पवार यांनी 'घरकुल भ्रष्टाचार' प्रकरणी भ्रष्ट अधिका-यांच्या केलेल्या पोलखोलीची दखल घेऊन 9 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे घरकुल प्रकरणात कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून लाच मागितली होती हि लाच स्वीकारली असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पवार यांनी दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याप्रकरणी कळवले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे.
'भ्रष्टाचा-यांचा कर्दनकाळ आणि सर्वसामान्यांचे तारणहार म्हणजे..आमदार राजेश पवार' अशीच चर्चा या कारवाईनंतर नांदेड जिल्ह्यासह नायगाव मतदारसंघातील नागरिकांमध्ये सध्या सुरु आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis