
नांदेड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी कोणताही उत्सव साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपत एक वेगळी पुढाकार घेण्यात आली. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर, “फुल न फुलाची पाकळी” म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत नांदेड उत्तर ग्रामीण मंडळाध्यक्ष व वाडी (बु.) येथील उपसरपंच बापूराव (छोटा बंडू) पावडे यांच्या तर्फे ₹1,11,000 (एक लाख अकरा हजार रुपये) इतक्या धनादेशाचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस योगदान देण्यात आले.ही मदत रक्कम अशोकराव चव्हाण.यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली असून, त्यांच्या या प्रेरणादायी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis