परभणी -काँग्रेसजणांनो चार-सहा महिने महत्वाचे - माजी आमदार सुरेश देशमुख
परभणी, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। येत्या चार-सहा महिन्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका अत्यंत महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी या चार-सहा महिन्यांचे महत्व ओळखून अंग झटकून कामास लागावे, असे आवाहन काँग्रेस
काँग्रेसजणांनो चार-सहा महिने महत्वाचे - माजी आमदार सुरेश देशमुख यांचे प्रतिपादन


परभणी, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। येत्या चार-सहा महिन्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका अत्यंत महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी या चार-सहा महिन्यांचे महत्व ओळखून अंग झटकून कामास लागावे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश देशमुख यांनी केले. काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार देशमुख, ज्येष्ठ नेते भगवानराव वाघमारे, महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, अमोल जाधव, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, माजी नगरसेवक सुनील देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते देशमुख यांनी निवडणूकांबरोबर काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीचा सुध्दा विषय समोर आहे. विशेषतः चार-सहा तालुक्यांमधील तालुकध्यक्ष पदासह शहराध्यक्ष पदाचाही विषय महत्वपूर्ण आहे. आपण त्या दृष्टीने आता सर्वतोपरि तयारी करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande