अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सहकार मंत्र्यांनी दिले एक महिन्याचे वेतन
लातूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सहकार मंत्र्यांनी दिले एक महिन्याचे वेतन मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्
अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सहकार मंत्र्यांनी दिले एक महिन्याचे वेतन


लातूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सहकार मंत्र्यांनी दिले एक महिन्याचे वेतन मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आपलाही खारीचा वाटा असावा या उदात्त हेतूने त्यांनी आपले एक महिन्याचे मंत्रीपदाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

​यासंदर्भात मंत्री पाटील यांनी राज्याच्या अप्पर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांना पत्र दिले आहे. यात त्यांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कपात करण्याची विनंती केली आहे. शासनासोबतच आपणही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत, हा संदेश त्यांनी या कृतीतून दिला आहे.

​कोट

​सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, सर्वसामान्यांचे झालेले हे नुकसान अतिशय वेदनादायी होते. राज्य सरकारने शक्य तितक्या तातडीने नुकसानग्रस्तांना मदतीचा हातही दिला होता. मी स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या दुःखाची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि म्हणूनच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बांधवांसाठी मदतीचा हात म्हणून माझे ऑक्टोबर महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

​राजकीय वर्तुळातून या निर्णयाचे स्वागत होत असून, शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात सहकार मंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारा असल्याचे बोलले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande