
अमरावती, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या निर्देशानुसार अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. तडीपार आरोपी शेख शहबाज उर्फ मुरारी शेख कलीम (वय २४, रा. पठाण चौक, अमरावती) याच्याकडून एक गावठी बनावटी देशी कट्टा, दोन जिवंत काडतुसे व ऍक्सेस मोपेड (क्र. MH 27 DV 7302) असा एकूण ₹१,१९,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे पथक दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. आरोपी ऍकेडमी हायस्कूल मैदानावर गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्रासह उभा असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ छापा टाकून आरोपीस ताब्यात घेतले.
जप्त मुद्देमालात —१) देशी बनावटीचा लोखंडी कट्टा (मॅगझीनसह) किंमत ₹३५,०००/-२) दोन जिवंत काडतुसे किंमत ₹४,०००/-३) अॅक्सेस दुचाकी (MH 27 DV 7302) किंमत ₹८०,०००/-असा एकूण ₹१,१९,०००/- किंमतीचा माल समाविष्ट आहे.
आरोपी शेख शहबाज उर्फ मुरारी शेख कलीम याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यात चोरी, मारहाण तसेच खुनाचे गुन्हे समाविष्ट आहेत.ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि अमोल कडू, पोहया दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, सुनील लासूरकर, जहीर शेख, मनोज ठोसर, अतुल संभे, वेतन कराडे, राजीक सयलीवाले, आणि सुरज चव्हाण यांच्या पथकाने केली.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी