लातूर - चोरीचा गुन्हा उघड; एक आरोपी अटकेत
लातूर, 30 ऑक्टोबर, (हिं.स.) लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील रिंग रोडलगत मंत्री प्लाझा समोर दिनांक 23/10/2025 रोजी मध्यरात्री सुमारास (12.00 वाजता) एका इसमावर हल्ला करून त्याच्याकडून ₹5,000/- किमतीचा मोबाईल फोन जबरीने हिसकावून नेल्याची
जबरी चोरीचा गुन्हा उघड एक आरोपी अटकेत  एमआयडीसी पोलिसांना यश


लातूर, 30 ऑक्टोबर, (हिं.स.) लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील रिंग रोडलगत मंत्री प्लाझा समोर दिनांक 23/10/2025 रोजी मध्यरात्री सुमारास (12.00 वाजता) एका इसमावर हल्ला करून त्याच्याकडून ₹5,000/- किमतीचा मोबाईल फोन जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती.

या घटनेनंतर फिर्यादी परशुराम उर्फ प्रशांत सिद्धेश्वर मार्तंडे (वय 27 वर्षे, रा. मित्र नगर, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन, लातूर येथे दोन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा रजि. क्र. 776/2025 हा कलम 309(6), 3(5) बी.एन.एस. प्रमाणे दिनांक 23/10/2025 रोजी जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लातूर, मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक लातूर, तसेच समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत गुन्ह्यातील एक आरोपी अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे.उमेश प्रल्हाद शिंगाडे (वय 26 वर्षे, रा. इंडिया नगर, लातूर) यास अटक करण्यात आली आहे .

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखालील डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोगुलवार, सहाय्यक फौजदार भिमराव बेल्लाळे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande