नाशकात सपाचे ट्रिपल इंजिनच्या नावावर चंदा दे दे आंदोलन
नाशिक, 30 ऑक्टोबर (हिं.स.) मालेगावमध्ये सामान्य रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा असल्यामुळे समाजवादी पक्षाच्या वतीने या ठिकाणी ट्रिपल इंजिन के नाम पे चंदा देदे असे अनोख्या आंदोलन करून सरकारसाठी चंदा गोळा केला. राज्य सरकारमध्ये तीन पक्षांचे सरकार आहे
नाशकात सपाचे ट्रिपल इंजिनच्या नावावर चंदा दे दे आंदोलन


नाशिक, 30 ऑक्टोबर (हिं.स.) मालेगावमध्ये सामान्य रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा असल्यामुळे समाजवादी पक्षाच्या वतीने या ठिकाणी ट्रिपल इंजिन के नाम पे चंदा देदे असे अनोख्या आंदोलन करून सरकारसाठी चंदा गोळा केला.

राज्य सरकारमध्ये तीन पक्षांचे सरकार आहे त्यामुळे काही ठिकाणी निर्णय घेण्यासाठी वेळ होतो तर काही ठिकाणी निर्णयात होत नाही या सगळ्या गदारोळ्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण विभागांना त्याचा फटका बसत आहे म्हणूनच आता सरकार विरोधात भावना देखील तयार होत आहेत महाराष्ट्र मध्ये असलेल्या सर्वसामान्य रुग्णालय संदर्भ रुग्णालय व इतर रुग्णालयांमध्ये अनेक अडचणी आहेत त्याचे प्रस्ताव हे जिल्हा नियोजन समिती व शासनाकडे पाठविण्यात आलेले आहेत परंतु त्याला मंजुरी मिळत नाही अर्थ खात त्याकडे दुर्लक्ष करत यासह अनेक अडचणी आहे.

गेल्या काही महिन्यांपासून येथील सामान्य रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची हेळसांड होत आहे. या प्रश्नी वारंवार पाठपुरावा करूनदेखील परिस्थितीत फरक पडत नाही. यामुळे औषध खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसा उपलब्ध नाही का, असा सवाल उपस्थित करत समाजवादी पार्टीतर्फे बुधवारी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ अनोखे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीन पक्षांच्या सरकार विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'ट्रिपल इंजिन सरकार के नाम पे चंदा दे बाबा... ए मावशी,ए काका, चंदा दे बाबा' असे म्हणत आंदोलकांनी लोकांपुढे झोळी पसरवत पैशांची मागणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande