बीड : डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र आंदोलन
बीड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंत्रालयाच्या समोर डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे सरकारकडे एकच मागणी करण्यात आली डॉ. संपदा मुंडे यां
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंत्रालयाच्या समोर


बीड, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंत्रालयाच्या समोर डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाद्वारे सरकारकडे एकच मागणी करण्यात आली डॉ. संपदा मुंडे यांच्या वर झालेल्या अन्यायाची सखोल चौकशी करण्यात यावी. राजकीय दबावाखाली सत्य दडपण्याचे प्रयत्न होत आहेत, पण आम्ही शांत बसणार नाही.

डॉ. संपदा मुंडे या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पूर्ण ताकदीने उभी आहे. सरकारने कितीही दडपशाही केली, धमक्या दिल्या, तरी सत्याचा आवाज आम्ही दाबू देणार नाही. न्यायासाठी लढणं हे गुन्हा नाही, आम्हाला न्यायासाठी लढणारच. यावेळी या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा- शहराध्यक्ष कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आमचा लढा न्याय मिळेपर्यंत सुरू राहील हा इशारा सरकार ला देण्यात आला..

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande