
छत्रपती संभाजीनगर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।
अल्पसंख्याक विकास विभागातर्फे डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2025 - 26 साठी या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी दि.14 नोव्हेंबर पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. प्रस्ताव दाखल करण्याकरीता योजनेचा शासन निर्णय व आवश्यक कागदपत्रांची यादी https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पात्रतेच्या अटी व शर्ती याप्रमाणे-
१. या योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असून नोंदणी करुन ३ वर्ष पूर्ण झालेल्या मदरसांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे.
२. ज्या मदरसांना Scheme for Providing Quality Education in Madarasa (SPQEM) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही.
अटी व शर्ती नुसार पात्र मदरसा चालकांनी मदरसांचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.14 नोव्हेंबर पर्यंत सादर करावे, विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis