
नाशिक, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : जिल्ह्यासह राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्जमाफी आणि विशेष आपत्ती पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेतर्फे करण्यात आली.
यासंदर्भात छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री आणि महसूलमंत्री यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना आशिष हिरे, सुभाष गायकर, प्रवीण पाटील, संगीता सूर्यवंशी, योगेश गांगुर्डे, भारत पिंगळे, ज्ञानेश्वर पालखेडे आदी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV