
परभणी, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील जिल्हा कारागृहात कैद्यांच्या उत्थानासाठी कार्य करणारे कीर्तनकार हभप निलेश महाराज झरेगांवकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, कार्यक्रमाचे संयोजक बाळासाहेब भालेराव, कारागृहाचे अधिक्षक राजेंद्र मरळे, सुनील देशमुख, भिमराव वायवळ, आनंद बनसोडे, गीता परिवाराचे अविनाश बिहाणी, हनुमान भुमरे, दत्तराव मुळे, माधवराव चव्हाण, भानुदास रेंगे, नारायण यादव, प्रशांत वाघीकर आदी उपस्थित होते. यावेळी झरेगांवकर महाराज यांचे सुंदर कीर्तन झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis