सोलापूर : लांबोटी पुलाची तपासणी पूर्ण; तिऱ्हे, वडकबाळ पुलांचीही तपासणी सुरू
सोलापूर, 30 ऑक्टोबर, (हिं.स.)।सप्टेंबर महिन्यात सीना नदीस आलेल्या पुराने लांबोटी (ता. मोहोळ), तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) व वडकबाळ (ता. दक्षिण सोलापूर) पुलास स्पर्श करून पाणी गेले. इतिहासात पहिल्यांदाच इतके पाणी आल्याने पुलास काही धोका झाला आहे का?
सोलापूर : लांबोटी पुलाची तपासणी पूर्ण; तिऱ्हे, वडकबाळ पुलांचीही तपासणी सुरू


सोलापूर, 30 ऑक्टोबर, (हिं.स.)।सप्टेंबर महिन्यात सीना नदीस आलेल्या पुराने लांबोटी (ता. मोहोळ), तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) व वडकबाळ (ता. दक्षिण सोलापूर) पुलास स्पर्श करून पाणी गेले. इतिहासात पहिल्यांदाच इतके पाणी आल्याने पुलास काही धोका झाला आहे का? याची तपासणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात लांबोटी पुलाची तपासणी पूर्ण झाली असून अद्याप अहवाल आला नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक स्वप्नील कासार यांनी सांगितले.

सीना नदीस आलेल्या पुरामुळे पुलांची तपासणी करण्यात येत आहे. भविष्यात कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी काळजी घेण्यात येत आहे. पुलाची निर्मिती करताना मागील १०० वर्षांत नदीपात्रात जी पाणीपातळी आली होती, त्याहून अधिक १० मीटर उंचीवर पुलाची उभारणी करण्यात येत आहे. त्यानुसारच लांबोटी, तिऱ्हे व वडकबाळ पुलाची उभारणी केली आहे. तीनही पुलाच्या गर्डरला पाणी लागल्याने धोक्याची शक्यता असल्यानेच तपासणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande