
लासलगाव, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।
मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार अनेक दिवसांपासून विंचूर येथून बंद झालेली पंचवटी एक्सप्रेस कनेक्ट बससेवा आज, ३० ऑक्टोबरपासून पूर्ववत करण्यात येत आहे. यामुळे विंचूर, लासलगाव येथून मुंबई, नाशिकला दैनदिन कामकाजासाठी जाणारे विद्यार्थी, नोकरदार व इतर व्यापारी वर्गांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.
लासलगाव रेल्वे स्थानकातून पंचवटी एक्सप्रेसला कनेक्ट असलेली विंचूर पंचवटी एक्सप्रेस कनेक्ट बससेवा अनेक दिवसांपासून बंद करण्यात आली होती. ही बससेवा पूर्ववत करण्याची मागणी प्रवासी वर्गाने मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. त्यांनतर मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने लासलगाव बस डेपोच्या आगार व्यवस्थापक सविता काळे यांना सदर बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना केल्या होत्या. बस विंचूर येथून पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी लासलगाव रेल्वे स्टेशन साठी सुटेल आणि रात्री १०.२० वाजता रेल्वे स्टेशनहुन विंचूरसाठी बस सुटणार आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा फायदा होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV