
परभणी, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीने तयार केलेला ‘मुख्यमंत्री रजक समृध्दी योजनेचा’ प्रोजेक्ट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सादर करण्यात आला. उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांनी गोव्यात मुख्यमंत्री सावंत यांना मुख्यमंत्री रजक समृध्दी योजना राबविण्याबाबतचा प्रोजेक्ट सादर केला. त्या संदर्भात तपशीलवार माहितीसुध्दा दिली. दरम्यान यावेळी शासनाच्या योजना अंत्योदय पर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीकोनातून ही योजना जशास तशी राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री सावंत यांनी मुख्य सचिवांना दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis