रत्नागिरी : लव्ह जिहादविरोधी कायद्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन
रत्नागिरी, 30 ऑक्टोबर, (हिं. स.) : लव्ह जिहादविरोधी कायदा विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात व्हावा, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीने निवेदन दिले. श्री. सामंत रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांना हे निवेदन देण्यात आले
लव्ह जिहादविरोधी कायद्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन


रत्नागिरी, 30 ऑक्टोबर, (हिं. स.) : लव्ह जिहादविरोधी कायदा विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात व्हावा, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीने निवेदन दिले.

श्री. सामंत रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांना हे निवेदन देण्यात आले असून हा कायदा लवकरच आणू, अशी ग्वाही सामंत यांनी समितीला दिली आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना हिंदू जनजागृती समितीचे गोविंद भारद्वाज, दुर्गा वाहिनीच्या स्वाती जोशी, सनातन संस्थेच्या माधुरी दीक्षित, शुभांगी मुळ्ये, कल्याणी धनावडे, दीपिका सुर्वे, मुक्ता भारद्वाज, देवेंद्र झापडेकर, अमितराज खटावकर, शशिकांत जाधव, तन्मय जाधव, स्वयं नायर, गणेश घडशी, अनंत मालप, अशोक पाटील, संतोष धनावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हा कायदा लवकरच आणू, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. हा कायदा होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्वरित शिफारसपत्रासह निवेदन पाठवतो, असे आश्वासन दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande