
छत्रपती संभाजीनगर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।धावत्या बसमधून उडी घेतल्यामुळे चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.गल्लेबोरगावजवळील घटना घडली आहे. खुलताबाद तालुक्यातील सोलापूर-धुळे महामार्गावर गल्लेबोरगावजवळ धावत्या बसमधून कांताबाई योगेश मरमट (४०, रा. देहाडे नगर, हर्सल सावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर) या महिला प्रवाशाने उडी घेतली. बसच्या मागील चाकाखाली न येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला.
कन्नड आगाराची बस (क्रमांक एमएच १४, बीटी ३०३८) कन्नड येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. गल्लेबोरगाव येथून या बसमध्ये कांताबाई बसल्या व त्यांनी वेरूळचे तिकीट घेतले. बस पळसवाडी परिसरातून जात असताना अचानक दरवाज्याकडे जाऊन त्यांनी धावत्या बसमधून उडी मारली.यात बसच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. वाहक व प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ही - महिला काहीशी अस्वस्थ होती.अपघाताची माहिती मिळताच खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी चालक, वाहक, तसेच प्रवाशांचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis