
लातूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)कांडप यंत्र, मिनी पिठाची गिरणी, पिकोफॉल यंत्र पुरवठा, लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण यांच्यामार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद सेस 20 टक्के मागासवर्गीय निधीमधून योजना राबविण्यात येत आहे. यामधून मागासवर्गीय महिलांना कांडप यंत्र, मिनी पिठाची गिरणी, पिकोफॉल यंत्र पुरवठा, मागासवर्गीय लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य (शेळीपालन), मागासवर्गीयांना 5 एच.पी. क्षमतेचा पाणबुडीपंप आदी साहित्य दिले जाणार आहे. या योजनेच्या योजनानिहाय पात्र अर्जदाराची निवड प्रक्रिया 3 नोव्हेंबर, 2025 रोजी दुपारी 12 वाजता लातूर जिल्हा परिषदेच्या स्थायी सभागृहात होणार आहे, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis