
नाशिक, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने 'एनएमआरडीए' मार्फत सुरू असलेल्या कारवाईविरोधात महिरावणी येथे शेतकरी साखळी उपोषणाला बसले आहेत. बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेत कैफियत मांडली.
त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अतिक्रमणावर 'एनएमआरडीए'कडून कारवाई केली जात आहे. त्यात शेतकऱ्यांची घरे तुटत असून व्यावसायिकही प्रभावित झाले आहेत. लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच महिलांनी हातातील बांगड्या फोडून रास्ता रोको करत सरकारविरोधात आक्रोश केला होता. तर बाधित संदीप फाऊंडेशन येथे साखळी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या प्रतिनिधींनी बुधवारी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत नाशिक- त्र्यंबक रस्त्यासंदर्भात गाऱ्हाणे मांडले. यावेळी माजी नगरसेवक तानाजी जायभावे, अॅड. प्रभाकर खराटे, उत्तमराव खांडबहाले, भाऊसाहेब खांडबहाले, कचरू मोरे, गोकुळ खांडबहाले उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV