परभणी -शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावे, प्रहार जन पक्षाची तहसीलदारांकडे मागणी
परभणी, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। नागपूर येथे सुरू असलेल्या शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ व दिव्यांग बांधवांच्या महाएल्गार आंदोलनाची शासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी प्रहार जन पक्ष परभणी शहर शाखेतर्फे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावे – प्रहार जन पक्षाची तहसीलदारांकडे मागणी


परभणी, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। नागपूर येथे सुरू असलेल्या शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ व दिव्यांग बांधवांच्या महाएल्गार आंदोलनाची शासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी प्रहार जन पक्ष परभणी शहर शाखेतर्फे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनात म्हटले आहे की, बच्चुभाऊ कडू, राष्ट्रीय अध्यक्ष प्रहार जन पक्ष व माजी राज्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कामगारवर्ग आपली न्याय्य मागणी घेऊन मागील दोन दिवसांपासून नागपूर येथे आंदोलन करत आहेत. मात्र, शासन या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. शहर प्रमुख अंकुश गिरी, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, जिल्हा सचिव रामेश्वर पुरी, तालुका प्रमुख सोनालीताई खिल्लारे, तसेच कार्यकर्ते सुर्यकांत आगलावे, सय्यद रफीक, नारायण गरुड आदींच्या स्वाक्षरीसह सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, “राज्य शासनाने बच्चु कडू व शेतकरी नेत्यांसोबत आज होणाऱ्या बैठकीत चर्चा करून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी शासनाची असेल.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande