
लातूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)रेणापूर येथे आज शिवसेना शिष्टमंडळाने तहसीलदार व SDO यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथांना आवाज दिला. यावेळी मराठवाडा सचिव ॲड. अशोक पटवर्धन साहेब, जिल्हाप्रमुख सचिनभैय्या दाने साहेब यांनी SDO अविनाश कोरडे साहेब व तहसीलदार थोरात साहेब यांची रेणापूर तहसील कार्यालयात भेट घेऊन तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.अतिवृष्टीच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे. मागील पावसाच्या फटक्यातून अजून सावरतही नाही तोच या ढगफुटी सदृश पावसाने त्यांच्या संसाराची सर्व स्वप्ने पुन्हा मातीमध्ये मिसळून टाकली.
आताच रब्बी हंगामाची पेरणी केली, पिकाला अंकुर फुटले, तेवढ्यात आभाळ फुटलं — आणि मेहनती शेतकऱ्यांचे घामाने सिंचन केलेले पीक वाहून गेलं. आता त्यांच्या समोर पुन्हा एकदा दुबार पेरणीचे भीषण संकट उभं आहे. हातात काहीच नाही, कर्जाचं ओझं मात्र वाढतच आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून, नुकसानभरपाई देण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मराठवाडा सचिव ॲड. अशोक पटवर्धन,जिल्हाप्रमुख सचिन दाने,महिला जिल्हाप्रमुख जयश्रीताई भुतेकर,तालुका प्रमुख कोंडीराम काळे, रेणापूर शहर प्रमुख रविकांत चव्हाण,युवासेना जिल्हाध्यक्ष कुलदीप सूर्यवंशी, VJNT/OBC चे जिल्हाध्यक्ष विशाल देवकाते,उपजिल्हा प्रमुख दिशा देशमुख, प्रगती डोळसे,,महिला तालुका प्रमुख रुक्मिणी इंगळे आणि शिवसैनिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis