येलदरी जलाशयाचे आणखी दोन दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु
परभणी, 30 ऑक्टोबर, (हिं.स.)। पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु झाली असून त्यामुळे पाटबंधारे खात्याने येलदरीचे क्रमांक 5 व 6 हे दोन दरवाजे गुरुवारी सायंकाळी 4 वाजता उचलून पूर्णा नदीच्य
येलदरी जलाशयाचे आणखी दोन दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु


परभणी, 30 ऑक्टोबर, (हिं.स.)। पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु झाली असून त्यामुळे पाटबंधारे खात्याने येलदरीचे क्रमांक 5 व 6 हे दोन दरवाजे गुरुवारी सायंकाळी 4 वाजता उचलून पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु केला आहे.

येलदरीच्या पाणलोट क्षेत्रात खडकपूर्णा प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाटबंधारे खात्याने त्या प्रकल्पाच्या 11 पैकी 7 दरवाजे उघडून पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु केला. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील ते पाणी येलदरीच्या जलाशयापर्यंत पोहोचले असून त्यामुळेच येलदरी जलाशयातील पाणी पातळी व पाण्याची आवक ओळखून पाटबंधारे खात्याने बुधवारी सकाळी या जलाशयाचे 1, 5 व 10 असे तीन दरवाजे दरवाजे 0.5 मीटरने उचलून 8 हजार 439 क्युसेस एवढा पाण्याचा विसर्ग सुरु केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande