परभणी -लोअर दुधना प्रकल्पातूनसुध्दा दुधना नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु
परभणी, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। लोअर दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्यामुळे या जलाशयाचे 4, 5, 16 व 17 क्रमांकाचे दरवाजे आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता 0.20 मीटरने उघडण्यात येणार असून त्याद्वारे दुधना नदीच्या पात्रात 6 हजार 750 क्युसे
परभणी -लोअर दुधना प्रकल्पातूनसुध्दा दुधना नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु


परभणी, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। लोअर दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्यामुळे या जलाशयाचे 4, 5, 16 व 17 क्रमांकाचे दरवाजे आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता 0.20 मीटरने उघडण्यात येणार असून त्याद्वारे दुधना नदीच्या पात्रात 6 हजार 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे.

या प्रकल्पात सातत्याने पाणी पातळीत वाढ होत असून पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने 1,2,3, 18,19 व 20 क्रमांकाचे दरवाजे 0.20 मीटरने यापूर्वीच उघडण्यात आले होते. त्याद्वारे 4 हजार 50 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग दुधना नदीपात्रात सुरु होता. पाण्याची आवक ओळखून पाटबंधारे खात्याने गुरुवारी दुपारी 5 वाजता 4,5,16 व 17 या क्रमांकाचे दरवाजे 0.20 मीटरने उघडून दूधना नदीच्या पात्रात 6 हजार 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, जालना येथील पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी या संदर्भात नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande