महिला या समाजाच्या प्रगतीचा आधारस्तंभ -आ. डॉ. राहुल पाटील
परभणी, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। महिला या समाजाच्या आधारस्तंभ आहेत. नारीशक्तीशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही. त्यामुळे महिलांना सन्मान देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले. आमदार डॉ. पाटील यां
महिला या समाजाच्या प्रगतीचा आधारस्तंभ : आ. डॉ. राहुल पाटील यांचे प्रतिपादन


परभणी, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। महिला या समाजाच्या आधारस्तंभ आहेत. नारीशक्तीशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही. त्यामुळे महिलांना सन्मान देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले.

आमदार डॉ. पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने पुर्णा शहरातील हरिनगर, पंचशीलनगर येथे माजी नगरसेवक सुनील जाधव, सौ. अनिता जाधव आणि मित्र मंडळ यांच्या वतीने ‘सन्मान नारीशक्तीचा’ व साडी-चोळी भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास भंते पय्यावंश, कॉ. अशोक कांबळे, आयोजक सुनील व सौ. अनिता जाधव, गौतम भोळे, छगनराव मोरे, मुन्ना राठोड, गणपत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ. डॉ. पाटील म्हणाले की, महिलांच्या सन्मानासाठी व प्रगतीसाठी विविध माध्यमातून कार्य करणारे जाधव दाम्पत्य हे समाजभावनेची सांगड घालणारे कार्य करीत आहेत. जाधव दाम्पत्याने प्रभागातील विकासकामाबरोबरच आरोग्य शिबिर, ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले आहे. समाजसेवेसाठी तत्पर अशा सुनील जाधव यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठीशी माता-भगिनींनी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

या कार्यक्रमात दोन हजार महिलांना साडी-चोळीची दिवाळी भेट देण्यात आली. सूत्रसंचालन शाहीर सातोरे यांनी केले तर प्रास्ताविक सुनील जाधव यांनी सादर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विष्णू गुप्ते, बिनू संग्रेल, दिले संग्रेल, आनंद काचोळे, असिफ भाई, सिराज भाई, सुरज दारु, आनंद दीपके, पापा अण्णा, विशाल राजकुंडल, सिद्धू इंगळे, आकाश दवणे, विनोद खर्गखराटे, दीपक तिवारी, विशाल भिसे, संदीप खरे, बापूराव काळे, सुनील कांबळे, नियाकत अली, शेख मेराज, विजय पवार, मनोज गायकवाड, रवि भराडे, साई शिंदे, वैभव गायकवाड, विनोद भराडे आदींनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande