सोलापूर - शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी मागितले अर्ज
सोलापूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येत आहे की, मा. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्य
सोलापूर - शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी मागितले अर्ज


सोलापूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येत आहे की, मा. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या कार्यारंभ आदेश दिनांक 05 ऑगस्ट 2025 अन्वये शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यासाठी बाह्यस्त्रोत संस्थांना आदेश देण्यात आले आहेत. या संस्थांमध्ये मे. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व मे. महाराष्ट्र विकास ग्रुप यांचा समावेश आहे.

प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत एकूण तीन शासकीय आश्रमशाळा कार्यरत असून, सदर आश्रमशाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पदांवर (कंत्राटी स्वरूपात) पात्र उमेदवारांकडून 31 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाक यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande