लष्करी ताकदीसोबतच बौद्धिक क्षमता देखील आवश्यक - जनरल उपेंद्र द्विवेदी
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। “युद्ध आता झपाट्याने “संपर्कविरहित” होत चालले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत लष्करी शक्तीबरोबरच बौद्धिक क्षमता आणि नैतिक तयारी देखील तितकीच आवश्यक आहे”, असे भारतीय थलसेनेचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी
लष्करी ताकदीसोबतच बौद्धिक क्षमता देखील आवश्यक- जनरल उपेंद्र द्विवेदी


नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। “युद्ध आता झपाट्याने “संपर्कविरहित” होत चालले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत लष्करी शक्तीबरोबरच बौद्धिक क्षमता आणि नैतिक तयारी देखील तितकीच आवश्यक आहे”, असे भारतीय थलसेनेचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी सांगितले. ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीतील मानेकशॉ सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

जनरल द्विवेदी म्हणाले, “युवकांची भूमिका आता थिंक टँक, प्रयोगशाळा आणि रणांगण यांसारख्या विविध क्षेत्रांत दिसली पाहिजे.” या प्रसंगी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी देखील सेना अधिकारी, विद्यार्थी आणि संरक्षण तज्ज्ञांना संबोधित केले. हा कार्यक्रम सेना आणि संरक्षणविषयक थिंक टँक ‘सेंटर फॉर लँड वॉरफेअर स्टडीज यांच्या वतीने ‘चाणक्य डिफेन्स डायलॉग : यंग लीडर्स फोरम’ या अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.

मुख्य भाषणात सेना प्रमुखांनी युद्धाच्या बदलत्या स्वरूपावर आणि त्यानुसार रणनीतिक प्रतिसादाची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, “युद्ध आता अधिकाधिक ‘गैर-गतिशील’ आणि ‘प्रत्यक्ष संपर्काशिवाय’ होत आहे. त्यामुळे अशा युद्धांना तोंड देण्यासाठी केवळ लष्करी सामर्थ्य नव्हे, तर बौद्धिक क्षमता आणि नैतिक सज्जता अत्यावश्यक आहे.”या कार्यक्रमात कर्नल सोफिया कुरैशी देखील उपस्थित होत्या त्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान माध्यमांसाठी माहिती देणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांपैकी एक होत्या.

या प्रसंगी हेही जाहीर करण्यात आले की ‘चाणक्य डिफेन्स डायलॉग 2025’ चे आयोजन २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे. या परिषदेचा विषय “सुधारातून परिवर्तन : सक्षम आणि सुरक्षित भारत.”असा असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande