“संघाला बंदीची धमकी देऊन घाबरवता येणार नाही” : दत्तात्रय होसबळे
जबलपूर, 01 नोव्हेंबर (हिं.स.) : काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर 3 वेळ बंदी घालण्याचा प्रयत्न केला आहे. आता चौथ्यांदा तसे करून पाहिले तरी चालेल. संघाला बंदीची धमकी देऊन घाबरवता येणार नसल्याचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी सांगितले. मध्यप्र
दत्तात्रय होसबळे, सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ


जबलपूर, 01 नोव्हेंबर (हिं.स.) : काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर 3 वेळ बंदी घालण्याचा प्रयत्न केला आहे. आता चौथ्यांदा तसे करून पाहिले तरी चालेल. संघाला बंदीची धमकी देऊन घाबरवता येणार नसल्याचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी सांगितले. मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे आयोजित संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. यानिमित्ताने होसबळे पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांनी म्हटले होते की, “जर पंतप्रधान नरेंद्र मोदी खरोखरच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा सन्मान करत असतील, तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी, जसे कधीकाळी तत्कालीन गृहमंत्री पटेल यांनी घातली होती. खरगे यांनी हेही म्हटले होते की हा त्यांचा वैयक्तिक विचार आहे, परंतु देशातील सर्व समस्या आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती यासाठी भाजपा आणि संघ जबाबदार आहेत.

यापार्श्वभूमीवर होसबळे म्हणाले की, भारताच्या समाज आणि राष्ट्रनिर्माणात जे संघटन कार्यरत आहे, त्यावर बंदी घालण्याची भाषा करणाऱ्या नेत्यांनी भूतकाळातील अनुभवांमधून शिकले पाहिजे. काँग्रेसने यापूर्वी तीन वेळा बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यातून काहीही साध्य झाले नाही. आता पुन्हा प्रयत्न करायचा असेल, तर त्यांनी हेही सांगावे की संघावर बंदी का घालायची आहे ?

होसबळे म्हणाले की समाजाने संघाला स्वीकारले आहे आणि पूर्वी लावलेल्या बंदींना न्यायालयानेही चुकीचे ठरवले होते. जेव्हा पूर्वी बंदी घातली होती, तेव्हा न्यायालयाने काय म्हटले आणि काँग्रेसला त्यातून काय मिळाले ? असा सवाल त्यांनी केला.

संघ देशाच्या सुरक्षा, संस्कृती आणि विकासासाठी काम करत असताना, अशा संस्थेवर बंदी घालण्याची मागणी कोणत्या तर्कावर आधारित आहे..? असा सवाल होसबळे यांनी उपस्थित केला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व राजकीय पक्षांचा आहे, परंतु हेही सत्य आहे की आमच्या संघात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अधिक आहेत. सरकार कोणत्याही पक्षाची असो, आम्ही आमचे विचार सर्वांसमोर मांडतो. आज सरकारमध्ये संघाचे स्वयंसेवक आहेत, त्यामुळे भाजपा आणि संघ यांच्यात समन्वय आहे. संघाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, हेही खरे आहे की भाजपा म्हणजे आपलेच घरचे लोक आहेत.

जातीनिहाय जनगणनेत राजकीय हेतू नको

जातीनिहाय जनगणनेबाबत होसबळे म्हणाले की, जातीनिहाय जनगणना राजकीय हेतूने होऊ नये. देशात काही जाती मागे राहिल्या आहेत, आणि जर केवळ त्यांच्याच कल्याणासाठी आकडे वापरले गेले, तर ठीक आहे; परंतु जर त्याचा वापर राजकारणासाठी झाला, तर समाजात फूट वाढेल.

लिव-इन रिलेशनशिप संदर्भात त्यांनी म्हटले की, ही पद्धत आपल्या संस्कृतीस योग्य नाही. पण प्रत्येक चूक कायद्याने थांबवता येत नाही; समाजाला संस्कार देऊन अशा विकृतींना आळा घालावा लागेल.

एसआयआर (मतदार नोंदणी प्रक्रिये) संदर्भात त्यांनी म्हटले की मतदार यादी महत्त्वाची आहे, आणि ज्यांना शंका आहे त्यांनी निवडणूक आयोगाकडे जावे.

जबलपूर येथील संघाच्या बैठकीत देशभरातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संघाचे आगामी कार्यक्रम, सामाजिक अभियान आणि देशभरात वाढणाऱ्या धर्मांतराच्या प्रश्नावर चर्चा झाली.

होसबळे म्हणाले की, “धर्मांतर रोखणे आणि ‘घरवापसी’ करणे आता अत्यावश्यक झाले आहे. देशभरात धर्मजागरणासाठी संघ विशेष प्रयत्न करत आहे.” विशेषतः जनजातीय भागांमध्ये धर्मांतर थांबवण्याबरोबरच धर्मजागृती पसरवण्यावर भर दिला जात आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande