
अमरावती, 31 ऑक्टोबर (हिं.स.) | मुख्यमंत्री १५० दिवस कार्यक्रमांतर्गत नागरिकांपर्यंत महापालिकेच्या कार्यवाही, निर्णय, योजना आणि उपक्रमांची माहिती पारदर्शकपणे पोहोचविण्यासाठी अमरावती महानगरपालिके तर्फे “महापालिका संदेशिनी” या अधिकृत न्यूज पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. या पोर्टलच्या माध्यमातून शहरातील स्वच्छता, पायाभूत सुविधा, पर्यावरण संरक्षण, नागरी सुविधा, विकासकामे, नागरिक सेवा आणि विविध सामाजिक उपक्रमांबाबतच्या बातम्या व अद्ययावत माहिती नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
महापालिका प्रशासनाने नागरिकांशी संवाद वाढविणे, पारदर्शक प्रशासन मजबूत करणे आणि नागरिकांना अधिक माहितीपूर्ण बनविणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले“महापालिका संदेशिनी” हे पोर्टल नागरिकांना शहरातील घडामोडी, निर्णय व उपक्रमांची अधिकृत व विश्वसनीय माहिती देणारे एक डिजिटल व्यासपीठ ठरणार आहे.अमरावती महानगरपालिकेच्या सर्व अधिकृत बातम्या, निवेदने आणि जनहिताची माहिती आता महापालिका संदेशिनी या पोर्टलवर उपलब्ध राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी