राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लावावा – मल्लिकार्जुन खर्गे
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर (हिं.स.) : देशातील बहुतांश कायदा व सुव्यवस्थेसंबंधी समस्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे निर्माण होतात. त्यामुळे संघावर प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याचे मत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केले. सरदार पट
मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस अध्यक्ष


नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर (हिं.स.) : देशातील बहुतांश कायदा व सुव्यवस्थेसंबंधी समस्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे निर्माण होतात. त्यामुळे संघावर प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याचे मत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केले. सरदार पटेलांच्या जयंती कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना खर्गे बोलत होते.

संघावरील प्रतिबंधाबाबत खर्गे म्हणाले की, संघावर प्रतिबंध लागावा हे आपले वैयक्तीक मत असून देशाच्या हितासाठी आवश्यक आहे. कारण देशातील बहुतेक सामाजिक समस्या, कायदे-सुव्यवस्था-संबंधी अडचणी संघ आणि भाजपशी संबंधित आहेत. देश ‘लोह पुरुष’ सरदार पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथि साजरी करत आहे. या दोन्ही महान नेत्यांनी देशाची एकता, अखंडता आणि प्रगती राखण्यात अतुलनीय योगदान दिले आहे; एक ‘आयरन मॅन’ तर दुसरी ‘आयरन लेडी’ होते. तसेच खर्गे यांनी सरदार पटेलांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांना लिहिलेल्या एका पत्राचा उल्लेखही केला. त्या पत्रात तत्कालीन गृहमंत्री पटेल यांनी स्पष्ट केले होते की, संघाने निर्माण केलेल्या वातावरणामुळे महात्मा गांधींची हत्या घडली.

भाजपा नेहमी हे दाखवण्याचा प्रयत्न करते की नेहरू आणि पटेल यांच्यात मतभेद होते; परंतु वास्तव हे आहे की दोघांनाही एकमेकांचा प्रामाणिक सन्मान होता. नेहरू यांनी पटेल यांच्या देशाची एकता राखण्याच्या भूमिकेची प्रशंसा केली, तर पटेल यांनी नेहरू यांना आदर्श नेता मानल्याचे खर्गे यांनी सांगितले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande