
जळगाव, 31 ऑक्टोबर (हिं.स.)प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेकडून आठवड्याच्या विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओखा–मदुराई आणि राजकोट – महबुबनगर दरम्यान या दोन नवीन गाड्या धावणार आहे. विशेष या गाड्यांना जळगाव आणि भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला असून यामुळे जळगावकर प्रवाशांची सोय झाली आहे.
पश्चिम रेल्वेकडून 09520 ओखा–मदुराई ही गाडी 3 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 दरम्यान प्रत्येक सोमवारी रात्री 10:00 वाजता सुटेल आणि जळगाव रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजून ३५ मिनिटाने तर भुसावळला सायंकाळी ७ वाजेला पोहोचेल. यानंतर गुरुवारी सकाळी 11:40 वाजता मदुराईला पोहोचेल. तर गाडी क्रमांक 09519 मदुराई–ओखा ही 7 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान प्रत्येक शुक्रवारी पहाटे 4:00 वाजता सुटेल आणि रविवारी सकाळी 10:20 वाजता ओखाला पोहोचेल.थांबे द्वारका, जामनगर, राजकोट, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आनंद, वडोदरा, भरूच, उधना, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, अकोला, पूर्णा, हजूर साहिब नांदेड, निजामाबाद, काचेगुडा, महबूबनगर, ढोणे, गूटी, रेनिगुंटा, काटपाडी, वेल्लोर कॅन्टोन्मेंट. तिरुवन्नमलाई, विल्लुपुरम, श्रीरंगम, तिरुच्चिरापल्ली, मानपराई, दिंडीगुल आणि कोडाईक्कनाल रोड स्टेशन दोन्ही दिशांनी.
गाडी क्रमांक 09575 राजकोट–महबूबनगर ही 3 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 दरम्यान प्रत्येक सोमवारी दुपारी 1:45 वाजता सुटेल आणि जळगाव स्टेशनवर दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २८ मिनिटाने तर भुसावळला ५ वाजून ५ मिनिटाने पोहोचेल. यांनतर त्याच दिवशी रात्री 8:00 वाजता महबूबनगरला पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 09576 महबूबनगर–राजकोट ही गाडी 4 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान प्रत्येक मंगळवारी रात्री 11:00 वाजता सुटेल आणि गुरुवारी सकाळी 5:00 वाजता राजकोटला पोहोचेल.
थांबेः या गाडीला वांकानेर, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आणंद, वडोदरा, उधना, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, वाशीम, हिंगोली, वसमत, पुर्णा, हजूर साहिब नांदेड, धर्माबाद, बसर, निजामाबाद, कामरेड्डी, मेडचाळ, काचेगुडा, उमदानगर, शादनगर आणि जडचेां स्टेशन दोन्ही दिशेने.सर्व गाड्यांमध्ये एसी २ टियर, एसी ३ टियर, स्लीपर व सामान्य दर्जाचे डबे असतील.
-------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर