वडवणी येथे निवडणूक पूर्व कार्यकर्ता बैठक
बीड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। वडवणी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता बैठक पार पडली. बैठकीची सुरुवात दिवंगत डॉ. संपदा मुंडे यांना भावपूर्ण आदरांजली वाहून करण्यात आली. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थां
स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण विकासाचा पाया!


बीड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।

वडवणी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता बैठक पार पडली.

बैठकीची सुरुवात दिवंगत डॉ. संपदा मुंडे यांना भावपूर्ण आदरांजली वाहून करण्यात आली.

या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १००% यश मिळवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. विकासकामांच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासाच्या आधारावर आपण ही निवडणूक लढवणार असून, आजवर झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवून पुन्हा विकासाच्या नव्या वाटचालीस प्रारंभ करू, असा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

इच्छुक उमेदवारांचा विचार करताना सर्व समाजघटकांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येईल, ही बाब बैठकीत अधोरेखित करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande