लातूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।
मागील आठवड्यात अहमदपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. याच अतिवृष्टीमध्ये अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुक येथील जटुरे ज्ञानोबा रामा ही व्यक्ती पुरात वाहून गेली होती. प्रशासनाच्या मदतीने तब्बल चार दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला. संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला तातडीने मदत देण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लक्ष रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर,भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदपूर तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुखसह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis