बीड, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड जिल्हा काँग्रेस यांच्या सहनियोजनातून भारती विद्यापीठ पुणे यांच्या तर्फे पूरग्रस्तांना मदतीचे वाटप काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मा.राहुल भैय्या सोनवणे यांच्या हस्ते बीड, गेवराई, शिरूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित गावांना करण्यात आले. यावेळी भारती विद्यापीठाचे चव्हाण सर, शिवाजी पाटील सर , बीड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवीणकुमार शेप, बीड तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे, गेवराई तालुकाध्यक्ष महेश बेदरे, शिरुर तालुकाध्यक्ष भास्कर केदार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बेदरे व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते..
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis