अमरावतीत I Love Mohammad चा वादंग!
अमरावती, 4 ऑक्टोबर (हिं.स.) : अमरावती शहरात पश्चिम भागातील उड्डाण पुलावर ''I Love Mohammad'' अशी स्टिकर्स लावल्यामुळे शहरात राजकीय वातावरण तापलं आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे स्टिकर्स लावणं म्हणजे दंगे करण्याचं कटकारस्थान असल्याचा थेट आरोप
अमरावतीत I Love Mohammad चा वादंग!


अमरावती, 4 ऑक्टोबर (हिं.स.) : अमरावती शहरात पश्चिम भागातील उड्डाण पुलावर 'I Love Mohammad' अशी स्टिकर्स लावल्यामुळे शहरात राजकीय वातावरण तापलं आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे स्टिकर्स लावणं म्हणजे दंगे करण्याचं कटकारस्थान असल्याचा थेट आरोप भाजपा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. जर त्यांना मोहम्मदवर प्रेम व्यक्त करायचं असेल, तर त्यांनी स्वतःच्या दुकानात, टॅक्सीमध्ये, ऑटोमध्ये लावावं. पण सार्वजनिक ठिकाणी लावून भडकावू वातावरण तयार करणं आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा बोंडे यांनी दिला. “हिंदूंनाही आता ठरवावं लागेल की कुणाच्या दुकानात जायचं, कुणाच्या ऑटोमध्ये बसायचं,” असे विधान करत त्यांनी सामाजिक बहिष्काराची सूचनाही अप्रत्यक्ष दिली. यावरून पुढे बोलताना ते म्हणाले, कोणी जास्त मस्ती करत असेल, तर त्याची मस्ती उतरविण्यास महाराष्ट्राचे पोलिस सक्षम आहेत! बोंडे यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, सार्वजनिक ठिकाणी 'I Love Mohammad' स्टिकर्स लावणाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी त्यांनी केली. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande