लातूर : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लातूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मनसेने घेतली लातूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट व निवेदन नवनिर्माण सेनेच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात सरसकट भरीव मदत करण्यात यावी तसेच बँका, प्रायव्हेट फ
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मनसेने घेतली लातूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट व निवेदन


लातूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मनसेने घेतली लातूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट व निवेदन

नवनिर्माण सेनेच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात सरसकट भरीव मदत करण्यात यावी तसेच बँका, प्रायव्हेट फायनान्स, मायक्रो फायनान्स यांच्याकडून शेतकऱ्यांना धमक्या देऊन सुरू असलेली जबरदस्तीची वसुली थांबवण्यात यावी या प्रमुख मागण्यासह खालील मागण्यासाठी जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन देण्यात आले.

1) शासनाने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या नियमानुसार जी मदत जाहीर केली आहे ती मदत अनियमित व अतिशय तोकडी आहे. ज्या शेतकऱ्याचे जेवढ्या क्षेत्राचे आणि जेवढे नुकसान झाले आहे त्या प्रमाणात त्यांना मदत मिळणार नाही असे दिसते आहे. त्यामुळे NDRF चे सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले आहे त्या प्रमाणात त्यांना भरीव मदत तात्काळ देण्यात यावी.

2) अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे व शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी परेशान आहे. त्यामुळे सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाना स्मरून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी तात्काळ द्यावी.

3) यावर्षी पिकविमा फक्त पीक कापणी प्रयोगानुसारच मिळणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे असे अनेक शेतकरी विम्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट विमा देण्यात यावा.

4)ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला विम्याच्या स्वरूपात नुकसानभरपाई मिळावी. नुकसानभरपाई मिळण्यापासून नुकसान झालेला एकही शेतकरी वंचित राहू नये या उद्देशाने विम्यासंदर्भात जे पाच ट्रिगर ठेवण्यात आले होते, ते ट्रिगर या वर्षी बंद करण्यात आलेले आहेत.ते ट्रिगर सुरू करण्यात यावेत. त्यातल्या त्यात यावर्षी स्थानिक नैसर्गिक आपत्ती हे ट्रिगर सुरू करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी.

5) मांजरा नदीवरील बॅरेजचे गेट पुराच्या वेळी न उघडल्याने शेतकऱ्यांचे जास्तीचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार पाटबंधारे विभागाचे अधिकारी आहेत. त्यांच्याच दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या विषयाची आपण जातीने चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

6) बँका, प्रायव्हेट फायनान्स, मायक्रो फायनान्स यांच्याकडून केली जात असलेली शेतकऱ्यांच्या कर्जाची जबरदस्तीची वसुली थांबवण्यात यावी.

7) सध्या पूरग्रस्त भागात गुराढोरांना चारा सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे गुरढोरांना तात्काळ चाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी अथवा अशा भागात जेथे गरज असेल तेथे चारा छावण्या उभा करण्यात याव्यात.

8) अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसून ते आज रस्त्यावर आले आहेत त्यांचे अन्नधान्य, भांडे, कपडे सर्वच गोष्टीचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना लातूर जिल्ह्यात आणखीनही शासनामार्फत काहीच मदत आलेली नाही तरी उघड्यावर पडलेल्या अशा कुटुंबियांना शासनाने तात्काळ मदत करावी.

संतोष नागरगोजे

प्रदेश सरचिटणीस तथा प्रदेशाध्यक्ष शेतकरी सेना

डॉ नरसिंह भिकाणे

जिल्हाध्यक्ष,मनसे लातूर

शिवकुमार नागराळे

भागवतराव शिंदे उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande