छ. संभाजीनगर - रविवारी विश्वकोश मंडळातर्फे भूविज्ञान नोंदलेखन कार्यशाळा
छत्रपती संभाजीनगर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व दयानंद महाविद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ५ रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, नागेश्वरवाडी, छ
छ. संभाजीनगर - रविवारी विश्वकोश मंडळातर्फे भूविज्ञान नोंदलेखन कार्यशाळा


छत्रपती संभाजीनगर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व दयानंद महाविद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ५ रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, नागेश्वरवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे एक दिवसीय भूविज्ञान लेखकांची नोंदलेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथगार संघटनेचे डॉ. राजशेखर बालेकर व प्रा. डॉ. पी. एस. कुलकर्णी उपस्थित असतील. सकाळी १०.३० ते ४:३० वाजेदरम्यान कार्यशाळा संपन्न होईल.

मराठी विश्वकोश हा सर्वविषयसंग्राहक संदर्भकोश असून यात मानव्य व विज्ञान विषयाच्या विविध शाखा व महत्त्वाचे विचारप्रवाह नोंदीच्या स्वरूपात समाविष्ट आहेत. मराठीचा प्रचार-प्रसार करणे, तसेच विश्वकोशीय लेखन प्रक्रियेत अभ्यासकांना सामावून घेणे या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेत भूविज्ञानविषयक विद्यार्थी व अभ्यासकांना आमंत्रित करण्यात आले असून विश्वकोश नोंदीचे महत्त्व, विज्ञानविषयक कोशीय लेखन तसेच विश्वकोश नोंदलेखनाचे विविध टप्पे या विषयांवर प्रा. डॉ. एस. के. वडगबाळकर व मोहन मद्वाण्णा हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेसाठी नोंदणी केलेल्या अभ्यासकांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्याव्यासंगी सहायक रवीन्द्र घोडराज यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande