* पाण्यात पडून चौघांचा झाला होता मृत्यू
छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लिबे जळगाव या गावाला भेट दिली. येथील गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथील ४ शाळकरी मुलांचा दसरा सणाच्या दिवशी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथील चार मुले खेळण्यासाठी गेली होती. दुर्दैवाने चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
आज त्यांच्या कुटुंबीयांची अंबादास दानवे यांनी सांत्वनपर भेट घेऊन संवेदना प्रकट केल्या.
याप्रसंगी कृष्णा पाटील डोणगावकर,बाळासाहेब चनघटे, नारायण जाधव,नवनाथ वैद्य, भगवान जाधव व गणेश राऊत उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis