भाजपा आ. संजय केनेकर यांनी सिल्लोडच्या व्यापाऱ्यांशी साधला संवाद
छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।भारतीय जनता पार्टीच्या वतीने जीएसटी अभियान व पदवीधर नोंदणी संदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे व्यापारी बांधवांची भेट घेऊन भाजपा प्रदेश महामंत्री आमदार श्री संजय केनेकर यांनी संवाद साधला. या सं
अ


छत्रपती संभाजीनगर, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।भारतीय जनता पार्टीच्या वतीने जीएसटी अभियान व पदवीधर नोंदणी संदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे व्यापारी बांधवांची भेट घेऊन भाजपा प्रदेश महामंत्री आमदार श्री संजय केनेकर यांनी संवाद साधला.

या संवादादरम्यान व्यापाऱ्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या तसेच नवीन करसुधारणांमुळे व्यापार व्यवस्थेत होणारे सकारात्मक बदल, पारदर्शकता आणि सोपेपणा याबाबत सविस्तर चर्चा झाली.

यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड,भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी,माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, माजी महापौर बापू घडामोडे, सभापती राधाकृष्ण पठाडे , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनिल मिरकर आदींसह मोठ्या संख्येने व्यापारी बंधू उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande