लातूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.) बांधकाम कामगाराच्या शरीरात घुसलेला लोखंडी रोड लातूरच्या डॉक्टरांनी बाहेर काढण्यात यश मिळवले. एका इमारतीच्या बांधकामावर काम करीत असलेला कामगार इमारतीच्या तिस-या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याच्या शरीरात इमारतीखालील अर्धवट उभ्या कॉलमचा १२ एमएम साईजचा जवळपास १० फुटाचा शरीरात लोंखडी रॉड घुसला होता. त्याला ताडडीने उपचारासाठी लातूरच्या सह्याद्री रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असता या दुर्मिळ आणि आव्हानात्मक केस मधील रूग्णावर सह्याद्री रुग्णालयातील डॉ. हनुमंत किनीकर यांच्या मागग्दर्शनाखाली डॉक्टरांच्या सर्जिकल टिम ने या रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.
बांधकाम कामगार सलामत मुबारक शेख रा. बाभळगाव ता. लातूर हा तिस-या मजल्यावरून खाली पडला. या अपघातात त्याच्या पोटात अंदाजे १२ एमएमचा जवळपास १० फुटाचा लोखंडी रॉड शरीरात घुसला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुलतान यास तेथील मजुरांनी सह्याद्री हॉस्पीटल मध्ये दाखल केले त्याच्यावर येथील डॉ. हनुमंत किनीकर यांनी प्राथमिक उपचार करून शरीरा बाहेरील दोन्ही बाजुचा शिल्लक रॉड आरा मशिनने कट करून त्याची लांबी कमी करून त्याचे सिटी स्कॅन केले.
या प्रक्रियेत काळजीपूर्वक शोध घेण्यात आला त्यांनतर तात्काळ डॉ. हुनमंत किनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने या दुर्मिळ आणि आव्हानात्मक केस मधील रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याच्या शरीरात घुसलेला लोखंडी रॉड बाहेर काढला. डॉ. हनुमंत किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जन डॉ. प्रमोद लोकरे आणि डॉ. निखिल काळे आणि भूलतज्ञ डॉ. सूरज फोलाणे यांचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis