सोलापूर येथे नदीत पडलेल्या मुलाला वाचवताना वडिलांचा दुर्दैवी अंत
सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। बापानं मुलावर आलेलं संकट स्वतःवर ओढवून घेतलं, मुलाचा जीव वाचवला; पण स्वतःचा जीव मात्र गमावला. बार्शी तालुक्यात घडलेली ही घटना ऐकून सर्वांचे डोळे पाणावले आहेत. या प्रसंगामुळे धामणगाव दुमाला परिसरात शोककळा पसरली आहे. ध
सोलापूर येथे नदीत पडलेल्या मुलाला वाचवताना वडिलांचा दुर्दैवी अंत


सोलापूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। बापानं मुलावर आलेलं संकट स्वतःवर ओढवून घेतलं, मुलाचा जीव वाचवला; पण स्वतःचा जीव मात्र गमावला. बार्शी तालुक्यात घडलेली ही घटना ऐकून सर्वांचे डोळे पाणावले आहेत. या प्रसंगामुळे धामणगाव दुमाला परिसरात शोककळा पसरली आहे.

धामणगाव दुमाला येथील अरुण उर्फ डेव्हीड सतीश बनसोडे (वय अंदाजे ३५) हे आपला सहा वर्षांचा मुलगा अनुग्रहसोबत नागझरी नदीवरील कोल्हापूर बंधाऱ्याजवळ गेले होते. तेव्हा नदीचं पाणी वाढलेलं होतं. मुलगा अनुग्रहचा पाय घसरून तो पाण्यात पडला. हे पाहताच क्षणाचाही विलंब न करता वडिलांनी मुलाला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली.

डेव्हीड यांनी जोरदार प्रवाहात झुंज देत मुलाला पाण्याबाहेर ढकललं आणि त्याचा जीव वाचवला. मात्र, पाण्याचा वेग अत्यंत प्रखर असल्याने आणि स्वतःला नीट पोहता न आल्याने ते प्रवाहात वाहून गेले. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; पण तो निष्फळ ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande