लातूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.) सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले महाराज यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे नेते राहुल केंद्रे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.आगामी स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री भोसले यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते गोविंदराव केंद्रे आणि राहुल केंद्रे यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट महत्त्वाची ठरली आहे.
विशेष म्हणजे लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना राहुल केंद्रे यांनी एक नवी ओळख राज्यात निर्माण केली विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने देखील घेतली होती अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्याच्या दौरावर आले असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला होता या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री भोसले यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील माजी आमदार गोविंदराव केंद्रे देखील राजकारणात सक्रिय आहेत त्यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. यावेळी आमदार संजय बनसोडे,जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, जि प मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis