परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीची आकडेवारी जाहीर
परभणी, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील 2 मंडळात प्रत्येकी सहा व सात वेळा, 5 मंडळात नऊ वेळा, 11 मंडळात चार वेळा, 13 मंडळात तीन वेळा, 10 मंडळात दोन वेळा व 4 मंडळात एकवेळेस अतिवृष्टी झाली असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने दिली.

या जिल्ह्यात गेल्या 24 तासात 34.06 मि.मी. एवढा पाऊस झाला. तर 1 जून ते आजपर्यंत 957.06 मि.मी. पाऊस झाला. या जिल्ह्यात 2 मंडळात प्रत्येकी सहा व सात वेळा, 5 मंडळात नऊ वेळा, 11 मंडळात चार वेळा, 13 मंडळात तीन वेळा, 10 मंडळात दोन वेळा व 4 मंडळात एकवेळेस अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात दोघेजण मृत्यूमुखी पडले तर सहा व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहुन गेल्या, तसेच शेतजमीनींसह खरिप पिकांचे अतोनात असे नुकसान झाले. त्याचे सर्व्हेक्षण व पंचनामे अद्याप सुरुच आहेत. सर्वसाधारणपणे 52 महसूल मंडळातील सरसगट सर्वच खरिप पिकांना मोठा तडाखा बसला.

छोटे, मोठे व मध्यम प्रकल्पातून हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग

जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पातून 4 हजार 203, सिध्देश्‍वर प्रकल्पातून 1 हजार 625, लोअर दुधना प्रकल्पातून 1 हजार 307 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मासोळी मध्यम प्रकल्पातून 4 हजार 838, ढालेगाव उच्च पातळी बंधार्‍यातून 17 हजार 623, तारुगव्हाण मधून 8 हजार 17, मुदगलमधून 13 हजार 526, मुळीतून 24 हजार 121 तर डिग्रस उच्च पातळी बंधार्‍यातून 49 हजार 161 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. हे सर्व प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

 rajesh pande