परभणी, 6 ऑक्टोबर (हिं.स.) सोमवारी पहाटे चार ते पाचच्या सुमारास परभणी शहरासह परिसरास मुसळधार पावसाने अक्षरश झोडपून काढले. या पावसाने सखल भाग पूर्णतः जलमय झाला, विशेषतः चोहोबाजूंच्या वसाहतीतील सखल भागातील अनेक घरांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. त्यामुळे कुटुंबीयांना तडाखा बसला. मध्यवस्तीसह चौहोबाजूंनी रस्ते चौक हे गुडघ्या एवढ्या पाण्याखाली आहेत. दरम्यान ठिकठिकाणी कुटुंबीयांनी महानगरपालिका, अग्निशामक दल, व पोलीस प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली .
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis