हिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्या घरावर बुलडोझर
पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। हिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई घर न्यायालयाची परवानगी नसतानाही पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर घर पाडायला विरोध करणाऱ्या महिलांचा विनयभंग करुन विलास परमार नावाच्या व्यक्तीने महेश खाडे व
हिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्या घरावर बुलडोझर


पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।

हिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई घर न्यायालयाची परवानगी नसतानाही पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर घर पाडायला विरोध करणाऱ्या महिलांचा विनयभंग करुन विलास परमार नावाच्या व्यक्तीने महेश खाडे व ३५ ते ४० गुंडांना सोबत घेऊन अत्याचाराची धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणात बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.

धनंजय देसाई यांच्या पौड येथील निवासस्थानावर विलास परमार नावाच्या व्यक्तीने महेश खाडे व ३५ ते ४० गुंड यांना घेऊन कोणत्याही प्रकारचे न्यायालयीन व प्रशासकीय आदेश नसताना जेसीबीने घर पाडले. यावेळी घरात ९० वर्षांची वयस्कर व्यक्ती व महिला उपस्थित होते पैकी महिलांना व १४ वर्षीय मुलीला हाताला व कपड्यांना धरून बाहेर ओढत आणले, त्यांचा विनयभंग केला आणि वृद्ध व्यक्तीस घरातच ठेवून घर पाडण्यास सुरुवात केली.अशा प्रकारचा भीषण त्रास घरातील लोकांना देत असताना काही लोक आडविण्यासाठी गेले असता महेश खाडे या व्यक्तीने आम्ही काहीही करू तुम्हाला काय करायचंय असे म्हटले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande