नाशिक, 6 ऑक्टोबर (हिं.स.) - विधानसभेमध्ये रम्मी खेळण्यावरून आता पुन्हा एकदा राजकारण तापले असून याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिक कोकाटे यांनी नाशिक न्यायालयामध्ये आमदार रोहित पवार यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. दरम्यान आज, सोमवारी सकाळी कोकाटे या ठिकाणी दाखल होत त्यांनी या याचिकेवर जबाब देखील नोंदवला आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुंबईमध्ये विधान भवनामध्ये उपस्थित असलेल्या त्या वेळचे कृषिमंत्री आणि आत्ताचे क्रीडामंत्री माणिक कोकाटे हे ऑनलाइन रमी खेळत असल्याचे समोर आलेले होते त्याबाबतचा व्हिडिओ हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रसारित केला होता या सर्व प्रकरणी त्यावेळेस मोठा गदारोळ झालेला होता आणि त्यानंतर कृषिमंत्री पदावरून कोकाटे यांची उचल बांगडी करून त्यांना राज्याचे क्रीडा मंत्री करण्यात आलेले होते.
या सर्व प्रकरणी वातावरण शांत झाले की काय अशी परिस्थिती असताना पुन्हा एकदा या सर्व प्रश्नावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या सर्व प्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री आणि नाशिक मधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माणिक कोकाटे यांनी नाशिकच्या न्यायालयामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे.
विधान परिषद सदस्य असलेले रोहित पवार यांना विधानसभेमध्ये येण्याची परवानगी नाही तरी ते का आले त्यांना हा व्हिडिओ कोणी पुरवला त्यामध्ये कोण आहे हे रोहित पवार यांनी आता सांगावे कारण नियमाचे उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. - माणिक कोकाटे, क्रीडा मंत्री
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV