लातूर मनपा शाळांचे विद्यार्थी दिल्लीच्या शैक्षणिक सहलीवर
लातूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)लातूर शहर महानगरपालिकेच्या विविध शाळातील विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीला रवाना झाले. राष्ट्रपती भवन, लाल किल्ला, इंडिया गेट, राष्ट्रीय संग्रहालय, संसद भवन आदी स्थळांना हे विद्यार्थी भेटी देणार आहेत. दि.१० ऑक्टोबर रोजी व
अ


लातूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)लातूर शहर महानगरपालिकेच्या विविध शाळातील विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीला रवाना झाले. राष्ट्रपती भवन, लाल किल्ला, इंडिया गेट, राष्ट्रीय संग्रहालय, संसद भवन आदी स्थळांना हे विद्यार्थी भेटी देणार आहेत. दि.१० ऑक्टोबर रोजी विद्यार्थी लातूर येथे परत येणार आहेत.दरम्यान रेल्वेचा आरामदायक प्रवासही विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे.

सहल हे शिक्षणाचे माध्यम आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष डोळ्यांनी विविध स्थळे पाहून त्यांचा इतिहास व वारसा समजून घेण्यासाठी सहलींचे आयोजन केले जाते. या सहलीतून विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्र, इतिहास आणि भारताची संस्कृती या संदर्भातील ज्ञानात भर पडणार आहे. मनपा शाळातील ५२ विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले असून १० शिक्षक आणि मार्गदर्शकही त्यांच्या समवेत आहेत. मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी महानगरपालिकेच्या प्रांगणातून विद्यार्थ्यांच्या बसला हिरवा झेंडा दाखवला.उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांची यावेळी उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना सहलीसाठी शुभेच्छा देताना आयुक्त श्रीमती मानसी म्हणाल्या की, दिल्ली ही केवळ देशाची राजधानी नाही तर ते भारताच्या समृद्ध इतिहासाचे आणि लोकशाहीचे प्रतीक आहे. या सहलीतून तुम्हाला पुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष अनुभवता येईल, असेही त्या म्हणाल्या. मनपाच्या शिक्षणाधिकारी आणि सहल प्रमुख श्रीमती श्वेता नागणे यांनी सांगितले की, प्रवासात विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य आहे. ही सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि अविस्मरणीय ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande