लीला पूनावाला फाउंडेशन एक वट वृक्ष: डॉ. किरण बेदी
पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.) लिला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) — शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेली सामाजिक संस्था — हिने आपल्या कार्याचा ३० वर्षांचा अभिमानास्पद टप्पा गाठला आहे. या निमित्ताने ३० वा पदव्युत्तर शिष्यवृत्ती
लीला पूनावाला फाउंडेशन एक वट वृक्ष: डॉ. किरण बेदी


पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.) लिला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) — शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेली सामाजिक संस्था — हिने आपल्या कार्याचा ३० वर्षांचा अभिमानास्पद टप्पा गाठला आहे. या निमित्ताने ३० वा पदव्युत्तर शिष्यवृत्ती वितरण सोहळा देवांग मेहता ऑडिटोरियम, पर्सिस्टंट सिस्टिम्स, पुणे येथे उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे माजी आयपीएस अधिकारी आणि पुदुचेरीच्या माजी राज्यपाल डॉ. किरण बेदी यांची प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती. विशेष म्हणजे, त्या १९९६ मध्ये एलपीएफच्या पहिल्याच पुरस्कार सोहळ्याच्या मुख्य पाहुण्या होत्या. तब्बल ३० वर्षांनंतर त्यांनी पुन्हा त्या मंचावर येऊन इतिहासाची पुनरावृत्ती केली. डॉ. बेदी म्हणाल्या, “१९९६ मध्ये मला शंका होती की ही संस्था दहा वर्षे टिकेल का. पण जर ती टिकली तर मी पुन्हा येथे येईन, असे मी त्यावेळी म्हटले होते. २००५ मध्ये मी परत आले आणि आज पुन्हा ३० वर्षांनंतर येथे उपस्थित राहून मला अत्यानंद होत आहे. लीला पूनावाला फाउंडेशन एक वट वृक्ष झाला असून हजारो युवतींना बळ देते आहे, जे अभिमानास्पद बाब आहे. मला खात्री आहे की ही संस्था कायमस्वरूपी चालत राहील.” या प्रसंगी संस्थापक विश्वस्त फे्रनी तारापोरे, शेर्नाझ एडीबम, माया ठदानी (व्हिडिओ संदेशाद्वारे) आणि फिरोज पुनावाला उपस्थित होते. सर्व विश्वस्तांनी आपले अनुभव मांडत सोहळ्याला संस्मरणीय स्वरूप दिले. डॉ. बेदींनी एलपीएफच्या ३० वर्षांच्या कार्यप्रवासावर आधारित स्मरणिका प्रकाशित केली. पुनावालांनी त्यांना विशेष भेट म्हणून एक भिंतीवरील घड्याळ प्रदान केले आणि म्हणाले, “ही घड्याळ सतत चालणाऱ्या आणि वाढणाऱ्या लिला पुनावाला फाउंडेशनचे प्रतीक आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande