राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील आरक्षणाची घोषणा
छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपर
अ


छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये मोहोळ, ओझर, भुसावळ, शिर्डी, दिग्रस, अकलूज, बीड नगरपरिषदांचा समावेश आहे.

नगरपालिकांची प्रभाग रचना अंतिम झाली होती. मात्र, आरक्षण जाहीर झाले नसल्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक होती. आरक्षणाच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने अनुसूचित जातींच्या (एससी) महिलांसाठी आरक्षित असलेल्या 17 नगरपालिकेंच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे 17 नगरपालिकांचा कारभार हा अनुसूचित जातींच्या महिलांच्या हातात असणार आहे. या आरक्षणामुळे राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे.

अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असेल्या नगरपालिकांमध्ये शिरोळ, देऊळगावराजा, मोहोळ, तेल्हारा,ओझर, वानाडोंगरी, भुसावळ, घुगुस,चिमूर, शिर्डी, सावदा, मैंदरगी, डिगदोहदेवी, डिग्रस, अकलूज, परतूर, बीड या नगरपालिकांचा समावेश आहे.

17 नगरपालिका एससी महिलांसाठी तर सहा नगरपालिका या अनुसूचित जमाती (एसटी) महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यामध्ये वणी, भडगाव, पिंपळनेर, उमरी, यवतमाळ, शेंदूर जना घाट या नगरपालिकांचा समावेश आहे.

आरक्षण जाहीर होण्यास सुरुवात झाल्याने राजकीय पक्षांकडून उमेदवारी निवडीस वेग येणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी होणार की नाही याचे चित्र अजुनही स्पष्ट नाही. शिवसेना महायुती करण्यास इच्छुक आहे. मात्र, भाजपने अजुनही अपेक्षित प्रतिसाद त्यांना दिला नाही. मात्र, आरक्षणाची घोषणा होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande