नांदेड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पूर परिस्थिती व धरणे आंदोलनासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली . काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते. 7 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धरणे आंदोलन घेण्याच्या संदर्भात बैठक संपन्न झाली.या बैठकीत मार्गदर्शन करून आगामी आंदोलनाची दिशा ठरवली.
या बैठकीला दक्षिण जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, आणि महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत पूरग्रस्त जनतेच्या अडचणी, शासकीय मदतीचा अभाव, तसेच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मदत व आंदोलनाच्या कार्यक्रमावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
“पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल. जनतेच्या वेदना आम्ही मांडल्याशिवाय थांबणार नाही.” असा इशारा देण्यात आला.बैठकीच्या शेवटी सर्व विभाग प्रमुख, सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्रितपणे सक्रिय होऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले..
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis